अकोला प्रतिनीधी :- गणेश वाडकर..
अकोला शहरातील रतनलाल प्लॉट स्थित व्हीएचबी कॉलनीमधील एका रहिवासी व्यक्तीकडून टिळक रोड येथे २९ लाख १८ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई सिटी कोतवाली पोलिस आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आचारसंहिता पथकाने केली. विधानसभा आचारसंहिता निवडणुकीच्या कालावधीत विनाअभिलेखे ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची ने-आण करता येत नाही. अकोला शहरातील रतनलाल प्लॉट भागतील व्हीएचबी कॉलनीमधील रहिवासी नवीन रामभज गुप्ता यांच्याकडून सिटी कोतवाली पोलिसांनी २९ लाख १८ हजार ८०० रुपयांची रक्कम जप्त केली.पुढील् तपास अधिकारी करत आहेत..