वर्धा प्रतिनिधी:-
वर्धा:- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाविकास आघाडी व इंडिया अलाएन्सचे उमेदवार शेखर प्रमोद शेंडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरुवारी पिपरी (मेघे) येथे सभा घेण्यात आली.
या सभेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत महाविकास आघाडीचे उमेदवार शेखर शेंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
कुणाल चौधरी यांनी केंद्रात व राज्यात मागील १० वर्षांपासून भाजपची सत्ता असल्यामुळे बेरोजगारीत वाढ झाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. महागाईने उच्चांक गाठला आहे. राज्यातील उद्योगधंदे इतर राज्यात गेले.
अशा सरकारला सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, इंडिया अलाएन्सचे प्रमुख अविनाश काकडे,
पक्ष निरीक्षक मिश्रा, उद्धवसेनेचे निहाल पांडे, शरद पवार गटाचे नेते समीर देशमुख, काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल, डॉ. शिरीष गोडे, राजेंद्र शर्मा, सुधीर पांगूळ, धर्मपाल ताकसांडे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष हेमलता मेघे, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे यशवंत झाडे, आपचे प्रमोद भोमले, रेपाइंचे महेंद्र मुनेश्वर, माजी जि. प. सदस्य संजय शिंदे, माजी पं. स. सदस्य राजेश राजूरकर, सतीश ईखार यांनी सुद्धा सभेला संबोधित केले.