शिरुर प्रतिनिधी:-सचिन दगडे
शिरूर : चाकण-शिक्रापूर रस्त्यावरून जात असलेल्या कारमधून तब्बल ३६ लाख ३९ हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. बुधवारी (ता. ६) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिसांनी चाकण-शिक्रपूर रस्त्यावर अचानक नाकाबंदी लावली. त्यावेळी एका संशयित इनोव्हा कार ची तपासणी करण्यात आली. मोटारीत पुढील बाजूस तब्बल ३६ लाख ३९ हजारांची रोकड आढळून आली. पोलिसांनी रोकड ताब्यात घेतली असून, आयकर विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित रक्कम कोठून आणली, तसेच कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार होती, याबाबत तपास सुरू असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.