वर्धा प्रतिनिधी:- दिनांक ०६-११-२०२४ रोजी अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा यांच्या वतीने *चला मतदानाचा निर्धार करू* हे मतदान जनजागृती वर पथनाट्य सादर करण्यात आले.कॉलेज मधील विधार्थ्यांनी मतदान का करावे. या बद्दल वर्धा बस स्थानक येथे नागरिकांना मतदानाचे महत्व सांगितले.या वेळी स्विप जिल्हा नोडल अधिकारी मा. मंगेशजी घोगरे,स्विप जिल्हा सहाय्यक नोडल अधिकारी मा.संजय जी नवले अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क प्राचार्य डॉ.अरविंद पाटील या वेळी उपस्थित होते.तसेच भाग्यश्री शेंदरे, निकिता आत्राम, रूपाली कोवे , साक्षी राजूरकर , संचाली सुरजुसे, हर्षदीप मानकर, राजेश वाघमारे आदी विद्यार्थी सहभागी होते.