अकोला प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
तेल्हारा पोलिस ठाणे हद्दीतील उकळी बाजार येथे तेल्हारा पोलिसांनी केलेल्या छापेमारीत १७ हजार रुपये किमतीची अवैध गावरान दारू जप्त केली. याप्रकरणी आरोपी संतोष शंकर बोरसे (वय ४०, रा. उकळी बाजार, ता. तेल्हारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक भास्कर तायडे यांच्या मार्गदर्शना नुसार ठाणे अंमलदार अमोल सोळंके, संदीप तांदूळकर, अतुल साबळे, यांनी गुप्त माहितीच्या आधारे उकडी बाजार येथे केलेल्या छापेमारीत आरोपीजवळून मुद्देमाल जप्त केला.