वर्धा प्रतिनिधी:-
गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून गुरुद्वारा श्री गुरुनानक दरबार मालगुजारीपुरा यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी प्रभातफेरी, गुरुवाणी पाठ, शब्द कीर्तन आदींसह अन्य धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला शुक्रवार, २ रोजी पासून सुरुवात झाली असून, १५ नोव्हेंबरपर्यंत शहरातील विविध मार्गाने
ही प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.
शहरातील विविध परिसरातून पहाटे पाच ते सकाळी ७ या वेळेत गुरुद्वारा येथून प्रभातफेरी काढण्यत येत आहे. सोबतच सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत भजन, कीर्तन होणार त्यानंतर लंगरचे आयोजन करण्यात आले आहे, असे गुरुद्वाराचे पाठी गुरुबच्चन सिंह यांनी सांगितले तसेच सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.