वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
आंबेडकर सभागृह आर्वी येथे औरंगाबाद येथील विद्यापीठ नामांतरण दिनाच्या निमीत्ताने आर्वी येथे एकदिवसीय धम्म प्रबोधन मेळावा संपन्न झाला या प्रोग्राम मधे भिक्षूंच्या हस्ते तथागत बुद्ध आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून बुध्द वंदना, व प्रवचन झाले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी रमाबाई आंबेडकर यांच्या जिवनावर आधारीत मिनाताई पाटील यांनी स्वताहा रमाबाईला प्रत्यक्ष डोळ्यासामोर घेवुन नाटिका लिहिली ” भीमाची सावली रमा माऊली” हि एकांकिका स्वताहा सादर करतातमिनाताई पाटील या एक तथागत बुध्दांची उपासिका आहेत म्हणून त्यांना बाबासाहेबांनी दिलेल्या बुध्द धम्माची तळमळ आहे त्या एक विपश्यी साधिका आहेत, स्वता आत्मपरीक्षण करून, समाजामधे पाय रोवला त्यांनी पहिला प्रयत्न सावित्रीबाई फुले यांचे जिवनावर एकांकिका लिहुन पंचशिल बुद्ध विहार काटोल नागपूर आंबेडकर हॉल मधे पण प्रयोग होत गेले त्या नंतर त्याच अनुभवाने रमाबाई यांचे जिवनावर एकांकिका लिहिण्याचा प्रयत्न केला आणी त्या प्रयन्ताला यश मिळतच असते आणी त्यातुन समाज प्रबोधन सुध्दा होत असते त्या सतत धम्म कार्यामध्ये त्यांनी स्वता तन मन धनाने धम्माचा गाढा 20 वर्षापासून चालवित असतात सर्वगुण संपन्न असणारी सुस्वभावी तरुणमुलगी स्वताचे जिवन धम्मकार्यामधे समर्पित केले निर्भिडपणे, प्रमाणीक पणाणे कुणालाही न भिता धम्म कार्य असो वा समाज कार्य असो त्या करीतच असतातत्या एक उत्तम कवयित्री आहेत, लेखिका आहेत, उत्तम डान्सर आहेत, कलाकार आहेत, बुद्ध भिमगित छान लिहितात आणी सुंदर आवाजामधे गातात त्यांना बुद्धांचे विचार बाबासाहेबांचे विचार ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांचे विचार आत्मसात करतात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, रमाबाई आंबेडकर पुरस्कार, सावित्रीबाई फुले, पुरस्कार व ऊत्तम समाजसेविका म्हणून पुरस्काराने त्या सन्मानित आहेत.


