पब्लिक पोस्ट : खुशाल वानखेडे राळेगाव ग्रामीण
……. दोन वर्षांपूर्वी खैरी ते गोताडी हा अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले असून आज दोन वर्षे उलटलेली एका बाजूचा सिंगल रोड पूर्ण झाला आहे त्याचेही काही काम अर्धवट आहे. मध्येच रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे म्हणून मनसेने या रस्त्याचे काम बंद केले होते हे विशेष. यावर सामाजिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने कामाच्या गुणवत्तेची चौकशी करून पुन्हा काम सुरू करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले होते. मात्र काम बंद पडून कित्येक महिने झाले परंतु ह्या रस्त्याचे काम सुरू व्हायचे नावाच घेत नाही आहे फक्त ज्या बाजूचा सिमेंट रोड झाला त्या बाजूला मुरूम टाकण्याचे काम कासव गतीने सुरू असून त्या मुरमावर दबाई केल्या जात नाही आहे आणि सिमेंट रस्त्याच्या व मुरूम टाकत असलेल्या जागेच्या मधातच विद्युत महावितरण चे इलेक्ट्रिक बोल उभे आहे. इलेक्ट्रिक बोर्डाचे इलेक्ट्रिक पोल उभे आहे त्यामुळे तिथे मुरूम टाकून त्या बजूने रस्ता सुरू केला. यासाठी ते इलेक्ट्रिक पोल उपडून
साईडला घ्यावे लागेल मात्र बांधकाम विभाग म्हणतात की आम्ही इलेक्ट्रिक उपडायचं परवानगी मागितली आहे तर इलेक्ट्रिक बोर्ड बनतात की असा कोणताही आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाहीये.

ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा रस्त्या मधातील इलेक्ट्रिक पोल बाजूला घेण्याचा प्रस्ताव दिला आहे हे विशेष. आता एक्साइड झालेला रस्त्यावर जर दुतर्फा वाहतूक चालली असता कोणतेही वाहन रस्त्याच्या बाजूच्या इलेक्ट्रिक बोर्ड पोल वरआदळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही
…….. या रस्त्याने शाळेतील मुला मुलींची व शेतकऱ्यांची व जनावरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. व ज्या एका बाजूने सिमेंट रोडचे काम झाले आहे व ज्या बजूने जाण्यासाठी ठेकेदाराकडून वाहतुकीसाठी रस्ता सुरू केला आहे त्या रस्त्यावर मोठमठे खड्डे पडून तो काम चलाओ रोड वाहतुकीस अयोग्य आहे. त्या रस्त्यावर बारीक मोठे गिट्टी पसरलेली असून शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना व वाटसरूंना कोणताही ट्रक वाहतूक गेली असता असून रस्त्यावरील गोटे उसळून रस्त्याने चालणाऱ्याचे डोके फुटले आहे यापुढेही फुटतच राहतील याची शक्यता नाकारता येत नाही. हे काम ज्यावेळेस पूर्ण व्हाव्यात होते त्याहीपेक्षा ह्या कामाला एवढा वेळ का लागत आहे हे मात्र उरमगडणारे कोडे आहे! कारण सामाजिक बांधकाम विभाग मारगाव व संबंधित ठेकेदार यांच्यात काहीतरी भिजत घोंगडे असल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच रस्त्याला लागून असलेले इलेक्ट्रिक खांब न उपडता रस्त्यावर मुरूम टाकून व त्या मुरुमाची दबाई कशी करणार असा सुद्धा यक्ष प्रश्न आहे. मात्र या रस्त्याच्या बांधकामाबाबतीत खैरी गावातील राजकारणी उदासीन दिसत असून फक्त निकृष्ट दर्जाचे काम झाले म्हणून ओरड करणारे पुढारी, नेते हा रस्ता केव्हा होणार यासाठी रस्त्याचे बांधकाम बंद करण्यात वरोडवर बसून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नुकतेच रस्त्याचे बांधकाम त्वरित सुरू करावे यासाठी ह्या रस्त्यावर चक्काजाम करण्यात को त्वरित सुरू न झाल्यास आमरण उपोषण करणार असा सुद्धा इशारा देण्यात आला होत. परंतु आजपर्यंत या रोडचे काम सुरू झाले नाही व कोणते नेतेही उपोषणाला बसले नाही हे मात्र विशेष! फक्त राजकारणासाठीच नेते रस्त्यावर येतात का असा प्रश्न सर्वसामान्य करताना दिसत आहे. तेव्हा अभियंता यांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करू म्हणून आश्वासन दिले परंतु आज कित्येक दिवस झाले तरी ह्या रस्त्यावर एक ते दोन दिवसात एका बाजूने थातूरमातूर मुरूम टाकून संबंधित विभागीय अभियंता व ठेकेदार वेळ निभावून नेत आहे मात्र रस्त्याचे काम लवकर करण्याचे प्रयत्न करताना दिसत नाही आहे.
तरी वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन हा खैरी ते गोटाडी अंतर्गत सिमेंट रस्ता लवकरात लवकर तयार करून देऊन ह्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू करावी व ह्या रस्त्याने जाणाऱ्या शालेय विद्यार्थी गावकरी तसेच शेतकऱ्यांचा मार्ग सुकर करावा अशी खैरी ग्रामवासियांची व वाहतूकदाराची इच्छा असून असे न झाल्यास मोठे तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत खैरी ग्रामवासी असल्याचे समजते.



