यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- कैलास कोडापे
खैरी येथे दिनांक १४-१-२५ रोज मंगळवारला जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान व्दारा दरवर्षी ४ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत रक्तदान महायज्ञाचे केले जाते.दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही यशवंत विद्यालय खैरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आपल्या महाराष्ट्र सिकलसेल, अँमेनिया,हिमोफिलीया , थॅलेसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फिल्युअर, पेशंट जास्त प्रमाणात आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट शासनाच्या रक्तपिढ्यांना रक्तबाटला देण्याचा आमच्या संप्रदयामार्फत निश्चित केले आहे.आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त पाच मिनिट रक्तदानासाठी आवश्यक आहे . तुमच्यासाठी ते आहे फक्त दान ,मात्र गरजुंना ते आहे जिवनदान ! याकरिता नरेंद्राचार्य महाराज संस्थान व्दारा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


