कोल्हापूर विभाग प्रतिनिधी :- किशोर जासूद
सुनील पाटील यांची कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड
कोल्हापूर: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी सुनील पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड जाहीर होऊन त्यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

सुनील पाटील हे डिजिटल मीडिया क्षेत्रात अनुभवी असून, पत्रकार बांधवांसाठी कार्यरत नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारांना नवा विश्वास व उर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी राज माने साहेब संस्थापक अध्यक्ष. सतीश सावंत उपाध्यक्ष. विकास भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. सुहास पाटील. प्रशांत चुयेकर. विनायक कलडोने.भाऊसाहेब फास्के कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष.सर्व पदाधिकारी. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार मित्र उपस्थित होते.

