किन्ही जवादे फाट्यासमोरील घटना
पब्लिक पोस्ट खुशाल वानखडे
वडकी: नागपूर ते हेद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील किन्ही जवादे फाट्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.१४) रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. प्रभाकरम मन्नीकम वय ३० वर्ष रा.अल्लापुरम (तामिळनाडू) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकरम व त्याचा सहकारी हे दोघे ट्रक क्र (टी एन- २९- सी वी ०४८३) घेऊन झांशी येथून शेंगदाण्याचे कट्टे भरून हेद्राबाद च्या दिशेने जात होते.जाताना राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील किन्ही फाट्यासमोरील वळणावर ट्रक चालक प्रभाकरम हा रोडच्या कडेला ट्रक उभा करून लघुशंकेला उतरला असता मागाहून येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने त्यास जबर धडक दिली यामध्ये प्रभाकरम याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच
घटनास्थळी वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे व पोलिस कर्मचारी अविनाश चिकराम यांनी भेट दिली.हा अपघात इतका भीषण होता की मृतकाचा डोक्याचा भाग चकनाचूर होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता याप्रकरणी महामार्गावर वाहनांची रांगच रांग लागली होती दरम्यान पोलिसांनी महामार्गाची वाहतूक सुळलीत करून घटनेचा पंचनामा केला असून याप्रकरणी अधिक तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे हे करीत आहे.


