मूर्तिजापूर येथे मुलीचा विनयभंग
अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
मूर्तिजापूर शहरातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीची वाईट उद्देशाने तुला खाऊ देतो, असे सांगून विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेची फिर्याद आज मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. पीडितेच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिची अल्पवयीन ११ वर्षाची मुलगी देवळासमोर खेळत असताना एका युवकाने वाईट उद्देशाने तिला खाऊ देतो असे आमीष दाखवून तिचा विनयभंग केल्याची फिर्याद दिली. यावरुन आरोपी रणजितकुमार प्रकाश दास (२३) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


