बार्शीटाकळी प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
चायना मांज्यामुळे आज पर्यत कमीत कमी अकोल्यात २० पेक्षा जास्त व्यक्ती जखमी झाले असून एकाचा मृत्यु झाला आहे. चायना मांज्याची अकोला शहरात कारवाईची मागणी आम्ही सातत्याने करत होतो. अकोल्यात लाखो रुपये किमतीचा चायना मांजा विकून पतंग उडविण्याचा प्रकार घडला असताना अकोला शहरात प्रशासनाकडून एक-दोनच कारवाई करण्यात आली. १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एसपी कार्यालयाजवळील एनसीसी कार्यालयाजवळ एका ३५ वर्षीय तरुणाचा गळा चिरल्याने त्याचा गळा चिरून मृत्यू झाला. किरण प्रकाश सोनोने, रा. अकोट फैल असे व्यक्तीचे नाव आहे.

तरीही सदर घटनेचा तपास होऊन चायना मांजा विक्रेते वर कारवाई व्हावी या साठी आमचे महाक्रांती न्यूज 24 चे प्रतिनिधी तसेच अकोला शहरातील अनेक नागरिक या याकडे लक्ष देऊन आहेत.


