यवतमाळ विभाग प्रतिनीधी: – सिद्धार्थ कदम (पुसद)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठातून दोन डिग्र्या घेता आल्या या परीसरात राहून शिक्षणाला किंमत देणारी तरूण अभ्यासात मग्न व लायब्ररीत स्वत:ला मग्न ठेऊन आपल्या भविष्यातिल जडनघडनीच स्नप्न उराशी बाळगनारे जिद्दी युवक प्रेरणेचे स्त्रोत होते.त्यांचा अवर्णनिय सहवास लाभला दिवसभराच्या काॅलेज नंतर विसावा म्हणून एखाद तास दररोज सांयकाळी विद्यापीठाच्या गेटजवळ येऊन बसणे हा नित्यक्रम येथे बसूनही विविध विषयावर चर्चा मित्रांसोबत व्हायची मी औरंगाबादला या परीसरात ७ वर्ष राहीलो. बाबासाहेबांच्या पदपर्शाने पावन झालेल्या नागसेन वन या परिसरात त्यांनी उभारलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयात एम ए राज्यशास्त्रात प्रवेशीत झाल्यावर या ठिकाणची महती माहीत तर होती पन प्रत्यक्षदर्शी जास्तच कळू लागली व कळाली बोलायची डेरींग सुध्दा येथे गेलो तेव्हा नव्हती वातावरन असे मिळाले की जिवनात बदल झाला बोलू लागलो. म्हणून जिवन बदलायच असेल स्वत:ला घडवायच असेल तर या उर्जेच्या केन्द्रात प्रवेशीत व्हा हा नेहमी सल्लाही नव्या विद्यार्थ्यांना मि देतो या ठिकाणी मी राहीलो शिकलो याचा अत्यानंद आजही मला आहे. ह्या क्रांती भूमीतून एम ए राज्यशास्त्र पहील्या श्रेणीत उतिर्ण झालो या ठिकाणची माती माथ्याला लावून या भूमीला नेहमी त्रीवार अभीवादन करत काॅलेजची दररोज सुरुवात व्हायची ते मी पाहत मी ही यात सामावलो नवेनवे विषय घेऊन नव्या संकल्पना जागृत व्हायच्या अस व्हायला पाहीजे… हे नको… सामाजिक जाणिवा निर्माण झाल्या तिथे एनर्जी मिळायची या ठिकाणचा विद्यार्थी बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरीत राहतो “शीका संघटीत व्हा संघर्ष करा ” त्यातील शीका ह्या पहील्या मुलमंत्राने भारावलेला दिसून पडतो मिलिंदच्या अजिंठा वसतीगृहात तर तो नित्य अभ्यासात मग्न व केवळ अभ्यासाबाबतचाच विषयच बोलतो ईतर विषयासंबंधाने त्याला घेणदेणच नसते जणू असे विद्यार्थ्यांचे प्रोडक्शन ही नागसेनवन भूमी करत आहे.
निडर व ध्येयाने भारावलेला असा विद्यार्थी मी याच परीसरात पाहीलाय मानूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा हा नागसेनवन व विद्यापीठ परीसर आहे. ही भूमी लढायची प्रेरणा व हिम्मतही देते म्हणून शंभरात मी एकटा जरी लढत राहीलो तरी ९९ ला गारद करील हा आत्मविश्वास याच भूमीने मला दिला हे मला आवार्जून या नामविस्तार दिनी सांगावस वाटत. या विद्यापीठाच्या नामविस्ताराकरीता अनेकांनी बलीदान दिले १४ वर्ष लढा दिला. नामांतर न होता मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला तिथे असतांनाच पहीला बाबासाहेबांचा पुतळा काढन्यात आल्याने पँथर गंगाधर गाडे यांनी शहीद स्मारकाची त्याच जागेवर विद्यापीठ गेटसमोर निर्मिती रातोरात केली व महानगर पालिकेकडून गेटच्या समोर नवा पुर्णाकृती पुतळा बसवन्यात आला त्याही प्रसंगाचा तिथे शिकत असल्याने साक्षीदार होता आले. नामविस्तार दिनाचा दरवर्षीचा तो सोहळा तिथे सतत सात वर्ष पाहता आला त्या ठिकाणची भरनारी पुस्तकांची जत्रा व लाखो रुपयांची पुस्तक खरेदी ही ह्या ठिकाणचे वैशिष्ये…. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून या विद्यापीठ गेट व स्मारकास अभीवादन करण्याकरीता येनारा जनसागर अवर्णनियच….. बाबासाहेबांप्रति असलेला आदर प्रत्येकांच्या डोळ्यातून प्रकर्षाने दिसून पडतो या महामानवाच्या प्रति नामविस्ताराकरीता जो लढा लढण्यात आला त्या लढ्यात शहीद झालेल्या शहीदांना व लढाई लढना-यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागले दलित वस्तीवर हल्ले झाले. दलितांच्या वस्त्या जाळल्या गेल्या. भीमसैनिक शहीद झाले त्यांचे संसार उध्द्वस्त झाले पन नामांतराचा लढा लढणे भीमसैनिकांनी सोडले नाही म्हणून कवी सुरेश भट आपल्या कवितेतून म्हणतात, “जाळलो गेलो तरी सोडले नाही तूला कापलो गेलो तरी तोडले नाही तूला ही तूला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना” ही पंक्ती जेव्हा मनाला भीडते तेव्हा ते नामांतर लढ्याच विदारक चित्र डोळ्यासमोर उभ राहत व डोळे आश्रुणी डबडबतात या प्रतिकुल स्थितीत हा लढा लढना-या बहाद्दर भीमसैनिकांना निळी सलामी देण्याकरीता व अन्यायाविरूध्द पेटन्याची व लढण्याची प्रेरना देणा-या या भूमीला नमन करन्याकरीता लोक येतात.ती प्रेरना घेण्याकरीता ती उर्जा घेण्याकरीता….. बाबासाहेब समजून घेतांना त्यांचे तत्वज्ञान समजत असतांना समता स्वातंत्र्य बंधूभावाची शिकवन आम्हाला मिळते नवनव्या कल्पना संकल्पना डोक्यात येतात कारन बाबासाहेबांची क्रांती ही विचाराची क्रांती आहे. मानव मुक्तीचा संगर आहे.मराठवाड्यात त्यांनी पहील महाविद्यालय मिलिंद सुरू करतांना त्यांना अनेक अडचनींना तोंड द्याव लागलं त्या पडीत जमिनीवर त्यांनी हे काॅलेज सुरू करून शिक्षणाची सुरूवात केली. तेव्हा लोकांनी त्यांना वेड्यात काढलं येथे कोण येणार शिक्षण घ्यायला हे बोलन्याचीही मजल गाठली पन बाबासाहेब द्रष्टे ते म्हणायचे पुढे येथे प्रवेश घ्यायला विद्यार्थ्याच्या रांगा लागतील.अॅडमिनिशन मिळणार नाही हे त्यांचे शब्द खरे ठरले. त्याच नागसेन वन परीसरात शिकणारा मुलगा हा या परीसरात पाऊल ठेवन्यापुर्वी या भूमीवर डोके ठेवतो स्वत:ला झूकवतो. खरच बाबासाहेब तूमची लेकर तुमच्याप्रति कृतज्ञ आहेत तुमचा वारसा चालवन्याकरीता धडपडत आहेत. स्वताला ज्ञानी बुध्दीवान बनवन्याकरीता स्वताला याच मातीतून स्फुर्ती घेऊन मोठ मोठ्या पदावर विराजमान झालीत व होत आहेत ही तुमच्या कतृत्वाची मोठी लढाईचा हा विजयच आहे… या विद्यापीठाला त्यामुळे तुमचे नांव मिळावे ही शासनासकट भीमसैनिकांचीही ईच्छा होती त्याकरीता लाँग मार्च सारखा मार्च काढन्यात आला दलित पँथर सारख्या रिजन नव्हे तर रिझल्ट पाहीजे असलेल्या संघटना रस्त्यावर आल्या ही तुमच्या प्रतिची कृतज्ञता भीमसैनिकांची राहनारच… व ती तूम्ही दिलेल्या संविधानिक मार्गाने लढून आम्ही भीमसैनिकांनी पुर्णत्वास नेली ही ताकदही तूमचीच होती व आमची तशी जडनघडन तुमच्या विचारानेच झालेले आहे ही लढाई १४ वर्ष चालवली हा तप जरी झाला असला तरी तत्वाला सोडले नाही पन लढाई लढून मागणी पुर्ण केली हा जिद्दी समाज तूमचीच निर्मीती आहे बाबासाहेब… त्या विद्यापीठात मला शिकता आले एम फील व बी एम सी जे करता आल हे माझ मी सौभाग्य समजतो यै विध्यापीठात शिकून आपल्या खेडे व गांव परीसरातील लोकांना त्याचा फायदा करता येईल ही ऊर्जो व प्रेरणेचे बौध्दीक स्त्रोतही तुम्हीच आहात बाबासाहेब.. माझ्या लोंकांकरीता त्यांच्या समस्या सोडवन्याकरीता झटतोय ही बौध्दीक ताकदही मी तूमच्या प्रेरणेने निर्माण केलीय बाबासाहेब माझ्या मनगटात मारन्याची ताकद नाही पन तलवारी पेक्षा जास्त पेनीची साह्याने समोरच्याला गारद करतोय ही पेनीची ताकद निर्माण करून कामे करतोय यासाठी अविरत झटतोय ही या तुमचे नामाभीदान असलेल्या विद्येच्या पीठाचीच देण आहे बाबासाहेब
तू……उभा सूर्यापरी, राहिली कोठे निशा
एवढे आम्हा कळे, ही तुझी आहे दिशा
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या शूभेच्छा…
संदेश गौतमराव रणवीर
एम.ए. (राज्य) एम फील(राज्य) नेट(राज्य) बी. एड., बी. एम.सी. जे.


