यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:- कैलास कोडापे
ट्रक चालवित असतांना लघुशंका लागली. त्यामुळे ट्रक चालकाने नागपूर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील किन्ही जवादे फाट्यासमोर ट्रक थांबवून खाली उतरले. अशातच अज्ञात वाहनाने ‘त्या’ ट्रक चालकाला जोरदार धडक दिली. , चालक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजी सकाळी घडली.

प्रभाकरम मन्नीकम वय ३० वर्ष रा. अल्लापुरम (तामिळनाडू) असे मृतकाचे नाव आहे. प्रभाकरम व त्याचा सहकारी हे दोघे टी एन- २९- सी वी ०४८३ क्रमांकाच्या ट्रकने झांशी येथून शेंगदाण्याचे कट्टे भरून हेद्राबादकडे जात होत. अशातच लघुशंकेसाठी महामार्गावरील किन्ही जवादे फाट्यासमोर रस्त्याच्या कडेला ट्रक उभा केला. यावेळी अज्ञात वाहनाने प्रभाकरम यांना उडविल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे, पोलिस कर्मचारी अविनाश चिकराम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.

