यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:- कैलास कोडापे
वडकी येथील स्माॅल वंडर्स हाय.स्कूल अँड ज्यु. काॅलेज वडकी येथे राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांची जंयती साजरी करण्यात आली.
या शाळेच्या अध्यक्षा डॉ. प्रा. कु.मंजुषा दौ.सागर होत्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.वंशिका शै. बेलेकर (वर्ग ९ वा) हिने केले. या जयंती निमित्त स्वरा महाजन,भारती शेडमाके,विरण्या फुटाणे,दिशांत फाले , श्रुष्टी गोफणे ,वैभव घोडाम ,आर्या सायंकार, यशदा शेटे, स्वरा केराम ,निरज राऊत या विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.
शाळेतील शिक्षकांनी राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वॄंद अहमद शेख , शंकर मालखेडे, प्रेमकुमार इंगोले,विजय फुलकर,नितीन गवळी,वैभव करडे,अक्षय वानखेडे, शन्नो शेख ,निता फुटाने ,ज्योती गजभे, कल्पना दाते , रुबी शेख, स्मिता झोटींग ,अश्वीनी तुराळे इ. शिक्षक वॄंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.प्रा कु.मंजुषा दौ. सागर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.


