अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
वाशिमः विनयभंग प्रकरणी आरोपीस पाचवर्ष सश्रम कारावास !
मालेगावअंतर्गत येणाऱ्या शेलगावराजगुरे येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी कार्तिक राधाकिशन उबाळे (वय ४०) यास ५ वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीयांने २०२१ मध्ये गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी आरोपीविरुद्ध तत्कालीन कलम पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयामध्ये दाखल पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना मार्गदर्शन केले.


