हातकणंगले प्रतिनिधी :-सचिन लोंढे
जनसेवा बहुउद्देशीय केंद्र कुंभोज चे काम उल्लेखनीय आमदार अशोकराव माने
कुंभोज (ता. हातकणंगले) येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि जनसेवा बहुउद्देशीय केंद्र यांच्या मर्दानी खेळाच्या आखाड्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील होते.
कार्यक्रमात सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे, पंचायत समिती सदस्या निर्मला माळी, संयोजक वर्षा कुंडले आणि नरेंद्र कुंडले, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगुले, संभाजी मिसाळ, पोलीस पाटील महंमद पठाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश गायकवाड, विनायक पोतदार, मुख्याध्यापक एम. ए. कुरणे, तसेच शिवसेना आणि विविध गटांचे स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षिका आणि पत्रकारांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला प्रोत्साहन मिळेल, तसेच मर्दानी खेळ संस्कृतीला बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


