विदर्भ विभाग :- गणेश वाडेकर
कौटुंबिक वादातुन दारुड्या पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगरूळ चव्हाळा ठाण्याच्या हद्दीत घडली. सदर घटनेनंतर आरोपी पतीने पोलीस ठाणे गाठून आत्मसर्पण केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुना चा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. छाया भूषण सुपरकर वय वर्षे 35 असे मृतक महिलेचे नाव आहे .तसेंच भूषण भीमराव सुपरकार असे आरोपीचे नाव आहे .भूषण हा पत्नी छाया यांच्या सह मंगरूळ चव्हाळा येथे वास्तव्यास होता. दारूच्या नशेत तो नेहमी पत्नी छाया यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करत होता.
पुढील तपास पोलीस करत आहेत.


