लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
निलंगा तालुक्यातील सावरी येथील कै मुरलीधर आचूळे यांच्या कुटुंबीयांना राजे मल्हार राव होळकर बचत गट व अन्य कर्मचारी यांच्यातर्फे 50000 रू ची मदत…
निलंगा पंचायत समितीचे माजी सदस्य सावरी गावचे मागील तीन टर्मचे कैलास जी मुरलीधर आचुळे यांचे 31 डिसेंबर 2024 रोजी दुर्दैवाने अकाली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ग्रामीण भागातील गाव गड्यांच्या लोकांसाठी तसेच सर्व सामान्य माणसाना न्याय मिळवून देण्यासाठी पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंबहुना प्रतिनिधी कडून न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करत असत..त्यांच्या जाण्याने अनेक ठिकाणी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..


