इचलकरंजी प्रतिनिधि :-सचिन लोंढे
इचलकरंजी: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कोल्हापूर नाईट हायस्कूल, इचलकरंजी येथे श्री स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दि. 12 जानेवारी 2025 पासून 19 जानेवारी 2025 पर्यंत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाची सुरुवात श्री स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रीडा ज्योती प्रज्वलित करून करण्यात आली. यावेळी उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली आणि कबड्डी स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, गोळाफेक, थाळीफेक, व धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्याचा विकास व सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गवळी सर, श्री. पाटील एस.एम., श्री. चौगुले यू.आर., श्री. शिंदे जी.आर., श्री. पाटील ए.बी., श्री. चव्हाण एस., श्री. मजगे बी.एम., तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा महोत्सव विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे.


