बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
स्थानिक लोणार येथील सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने दिनांक 11 जानेवारी 2025 सकाळी दहा वाजता स्कूल कनेक्ट NEP 2.0 कार्यक्रमाचे आयोजन स्कूल कनेक्ट 2.0 अभियानाचे प्रमुख आयोजक प्राचार्य डॉ प्रकाश क बनमेरू कै कु. दुर्गा क बनमेरु विज्ञान महाविद्यालय, लोणार यांच्या मार्गदर्शनात कै. कू. दुर्गा क बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार, कै. कमलाबाई बनमेरू कला व विज्ञान महिला महाविद्यालय, लोणार व स.व.पटेल हायस्कूल लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये लोणार शहरातील सर्व माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयातील वर्ग नववी ते बारावीचे सातशे च्य जवळपास विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . प्रकाश बनमेरू तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी जि. प. वाशिम , प्रा. शारीक शेख, मास्टर ट्रेनर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तसेच प्रमुख अतिथी म्हणून अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ संतोष बनमेरू , स. व.पटेल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड भास्कर राव सांगळे, स. व. पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रामेश्वर डोळे सर,जकिर हुसैन हायस्कूल चे मुख्याध्यापक डॉ फिरोज खान सर, इंदिरा गांधी हायस्कूल चे श्री खलिक सर, श्री शिवाजी हायस्कूल चे उप मुख्याध्यापक श्री रवि खरात सर, महाराणा प्रताप हायस्कूल चे श्री शेटे सर , श्री दहातोंडे सर , स.व. पटेल हायस्कूल चे पर्यवेक्षक सांगळे सर मंचावर उपस्थित होते.सर्वप्रथम या कार्यशाळेची सर्वात विद्यापीठ गीताने करण्यात आली. मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश मुख्याध्यापक श्री रामेश्वर डोळे यांनी मांडले. यानंतर विद्यापीठाचे मास्टर ट्रेनर प्रा. शारीक शेख यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करतांना NEP चे आकृतीबंध, अंमलबजावणी व भविष्यातील अभ्यासक्रमात होणारे बदल आणि त्याचे फायदे विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले. यानंतर दुसरे प्रमुख मार्गदर्शक शिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठल भुसारे सरांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात बोलतांना खुमासदार शैलीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य स्तंभ, शैक्षणिक आकृतीबंध, यामध्ये विद्यार्थ्यांना असलेले विषय निवड व आपल्या कलागुणांना वाढीचे स्वातंत्र्य, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी स्वाववलंबी कसा होणार आहे आणि देशाच्या विकासात युवा वर्गाच्या वाटा मोठा असेल , ग्रामीण भागातील गुणवत्ता खऱ्या अर्थाने जगाच्या समोर येणार आहे असे सखोल मार्गदर्शन केले . यानंतर आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू सरांनी NEP 2020 ची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांची उत्तमपणे सांगड घालावी लागणार आहे ,शिक्षकांना विषयाचा सखोल अभ्यास करून वर्गात जावे लागेल , या नवीन धोरणामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे आणि रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या संध्या या बाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी सचिव डॉ संतोष बनमेरू व ॲड भास्करराव सांगळे यांनी या अभियानासाठी विद्यापिठाचे कौतुक केले. या कार्यशाळेचे संचालन विशाखा राऊत मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री विष्णू बचाटे सर यांनी केले. या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी स.व.पटेल हायस्कूल व कै कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महावि्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.