अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
मूर्तिजापूर येथून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या हातगाव, जामठी खु. गावात दोन बिबट्यांनी दोन वासरांची शिकार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसेच या परिसरात बिबट्यांच्या पाऊलखुणाही आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हातगाव, जामठी येथील शेतकरी ज्ञानेश्वर रंगराव वाकोडे यांच्या गायीची दोन वासरे गोठ्याच्या बाहेर होती. यावेळी गावाच्या बाजूलाच असलेल्या शेत शिवारातून दोन बिबट्यानी गावात प्रवेश करुन गोठ्याच्या बाहेर असलेल्या या वासरांवर हल्ला केला.


