अकोला: बाल कामगारास कामावर ठेवणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल
अकोला विभाग प्रतिनीधी :- गणेश वाडेकर
शासनाच्या आदेशनुसार कोणीही बाल कामगार यास कामावर ठेऊ नये, असे आदेश असताना स्थानिक गोयंकानगर येथे एका वर्क शॉप चालकाने आपल्या कारखान्यात १६ वर्षीय बाल कामगार ठेवून त्याच्या जवळून काम करून घेत असताना दुकान निरीक्षक यांनी धाड टाकली असता, दुकान चालक विरूध्द बालकामगार संरक्षण कायदा अंतर्गत सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आयफाज खान (१६) राहणार सोनोरी हा गाड्या धुताना आढळल्याने दिनेश गोपाल शुक्ला (६०) रा. मूर्तिजापूर यांच्याविरुध्द सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


