लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
राजमाता जिजाऊ यांची 427 वी निलंगा येथील राष्ट्रमाता जिजाऊ चौक व जिजाऊ सृष्टी निलंगा येथे उत्साहात मराठा संघ व सेवा संघा अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली.जिजाऊ सृष्टी येथे राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विश्वदनीय जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.


