शहरातील पहिली महिला डॉ. सुशीलाताई उजवणे यांच्या सत्कार
यवतमाळ प्रतिनिधी :- कैलास कोडापे
राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती व श्री स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राळेगाव शहरात जयंती उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका शोभाताई इंगोले होत्या तर राळेगाव शहरात 1972 साली पहिले प्रसूती गृह सुरू करून घरीच प्रसूती सेवा देणाऱ्या राळेगाव शहरातील पहिल्या महिला डॉक्टर सुशीलाताई मारोतराव उजवणे यांचा त्यांच्या कार्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ हेमंत गांधी होते तर प्रमुख वक्त्या म्हणून सौ संगीता पिंपरे डॉ शितल कोकुलवार याप्रसंगी जिजाऊ वेशभूषा असलेल्या अनुश्री तामगाडगे, वैष्णवी सोनटक्के, गौरी राऊत, यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आढावा सांगितला याप्रसंगी डॉ. हेमंत गांधी यांनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृणाल उत्तरवार यांनी केले कार्यक्रमाचे संचालन वैशाली रोहनकर यांनी तर आभार प्रदर्शन दीक्षा नगराळे हिने केले याप्रसंगी अंजली बोबडे,भावना बहाळे, नुपूर कोमेरवार, पूर्वा राऊत, वंदना काकडे, सरला देवतळे, नगरसेविका जोत्स्ना राऊत, नगरसेविका कविता कुडमेथे, सुनिता तामगाडगे, प्रतिभा कोठारे, डॉ. सविता पोटदुखे, मंदा तोटे, सुलभा चिव्हाणे, स्वाती निंबुळकर, शामला बल्लेवार, सूक्ष्मलता सोनेकर, गायत्री त्रिपदवार, राजश्री मडावी, वैशाली उजवणे, सरला टाले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


