सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
वणी येथील विकास डान्स अकॅडमी वणी यांच्या मार्फत विदर्भस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन दिनांक ११ व १२ जानेवारी रोजी करण्यात आले होते.

या स्पर्धेत प्राची विजय बहादुरे हिने प्रथम क्रमांक पटकविला. प्रथम क्रमांक आल्याबदल टीव्ही स्टार लावणी कलावंत शुभम बोराडे सर यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लावणी सम्राज्ञी हा पुरस्कार ,शाल श्रीफळ ,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
या यशाचे श्रेय तीने गुरु मंगेश चटारे वणी व प्रजावती विजय बहादुरे (आई वडील) यांना दिले.
या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.


