पुणे विभाग : सचिन दगडे
पुणे : उद्योगनगरी म्हणून पुढे आलेल्या सावरदरी ( ता.खेड ) गावाने आपली बैलगाडा ही जुनी आवड आजही जपली आहे.गोंधळजाई देवी उत्सवानिमित्त ‘सरपंच केसरी’ ही बैलगाडा शर्यत गावात घेण्यात आली.चार दिवस चाललेल्या या शर्यतीत ५२५ बैलगाडे सहभागी झाले होते.शर्यतीचे आयोजन स्मार्ट व्हिलेज सावरदरीचे विद्यमान सरपंच संदिप बाळासाहेब पवार यांनी केले होते.७ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडल्या.तर ११ जानेवारीला फायनल आणि मेगाफायनल पार पडल्या.स्पर्धेमध्ये १ ट्रॅक्टर,१ बुलेट, १० दुचाकी,५ फ्रिज,३ एलईडी अशी अनेक बक्षीस ठेवण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जवळपास ५२५ बैलगाडे सहभागी झाले होते.त्यापैकी ७० बैलगाडे हे फायनलमध्ये पोहचले आणि ३६ बैलगाडे हे मेगाफायनलमध्ये म्हणजे बक्षिसांसाठी पात्र ठरले.
एक ट्रॅक्टर बक्षिसासाठी पाच बैलगाडे,एक बुलेटसाठी तीन बैलगाडे,दहा दुचाकीसाठी वीस बैलगाडे,पाच फ्रीजसाठी पाच बैलगाडे,तीन एलईडीसाठी तीन बैलगाडे पात्र ठरले.
घाटाचा महाराजा म्हणून पांडुरंग किसन काळे यांचा बैलगाडा पात्र ठरला असून त्यांना दुचाकी बक्षीस देण्यात आली.
या शर्यतीदरम्यान आमदार बाबाजी काळे,भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील,मनसेचे नेते राजेंद्र वागस्कर,सभापती विजय शिंदे,ज्ञानेश्वर महाराज दौंडकर,सोमनाथ महाराज माशेरे,म्हाळुंगे पोलिस स्टेशनचे प्रदीप पाटील,माजी उपसभापती अमोल पवार,मनसेचे जिल्हा अध्यक्ष समिर थिगळे,शिवसेना तालुकाप्रमुख रामदास धनवटे,मंगेश सावंत,अजय तापकीर,मंगेश काळे,विविध गावचे सरपंच,चेअरमन आदी उपस्थित होते.
- एक नंबर फायनल ट्रॅक्टरचे मानकरी –
१) वारिंगे-साखरे जुगलबंदी – १०.८८ मिली.
२) लांडगे-कराळे जुगलबंदी – १०.९३ मिली.
३) भागवत-चव्हाण जुगलबंदी – ११.०५ मिली.
४) मुटके-भोकसे जुगलबंदी – ११.१४ मिली.
५) माऊलीकृपा बैलगाडा संघटना-घुंडरे जुगलबंदी – ११.१४ मिली.
या बैलगाडा शर्यती दरम्यान समाजासाठी काम करणाऱ्या वारकरी संप्रदाय,पत्रकार,निवेदक, घाटातील निवेदक,डॉक्टर,पोलिस पाटील,सरपंच, चेअरमन अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच गावातील माजी सरपंच भरत तरस,मिरा कदम,संजय चौधरी,सतिश शेटे,बाळकृष्ण तरस,दत्तात्रय बुचूडे, विष्णू शेटे,महादु पवार,रंजना गाढवे,रेणुका शेटे,राजेंद्र मेंगळे या सर्व माजी सरपंचांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


