वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन कारंजा घा. जि. वर्धा तथा ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम नई दिल्ली द्वारा आयोजित विद्येची आद्यप्रणेता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच राष्ट्रमाता मा जिजाऊ यांची संयुक्त जयंती तसेच लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी प्रित्यर्थ ब्लाइंड स्टिक, जीवनावपयोगी वस्तू वितरण व स्नेह मिलन कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा घा. येथे दि. 11 जानेवारी 2025 रोजी पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस आदर्शांचे पूजन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे दान दाते दिवंगत वासुदेवराव निकोसे साहेब उपजिल्हाधिकारी अमरावती यांच्या स्मृतींना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात .आली.याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटीका जया अंभोरे संचालिका ,निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्था नागपूर , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामसुंदर राठी सामाजिक कार्यकर्ते आर्वी ,विशेष अतिथी सतीश अंभोरे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग वर्धा ,तसेच प्रमुख अतिथी चंद्रशेखर वाळके नायब तहसीलदार कारंजा, सांस्कृतिक भावनाचे संस्थापक धम्ममित्र शंकरराव घाडगे सर, राजू भाऊ लभाने प्रदेश कार्यकारणी सदस्य ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम, डॉ. विजय भट्ट साहेब सामाजिक कार्यकर्ता कारंजा, चेतन अग्रवाल सामाजिक कार्यकर्ता आर्वी, तुकारामजी बागडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता, त्याचप्रमाणे ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम नई दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष इमरान राही व माजी प्रदेशाध्यक्ष इंजि. विजय नाखले इ. मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते .वरील कार्यक्रमावर आधारित विचार मंचावरील मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,राष्ट्रमाता जिजाबाई व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचे विषयी विचार व्यक्त केले .त्याचप्रमाणे अंध, अपंग व्यक्तींना ब्लाइंड स्टिक व गरजूंना जीवनापयोगी वस्तू वितरणा मागची भूमिका स्पष्ट करून महापुरुषांना आपल्या मनोगतातून आदरांजली व्यक्त केली.यावेळी समाजामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल जयाजी अंभोरे नागपूर, श्याम सुंदरजी राठी आर्वी, सतीशजी अंभोरे कार्यकारी अभियंता वर्धा तसेच चंद्रशेखर वाळके नायब तहसीलदार कारंजा यांना बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन कारंजा घा. जिवर्धा चे पदाधिकारी अशोक नागले , इंजि. विजय नाखले, धम्ममित्र मंदा नागले, जी.आर. गवई ,एस. आर. इंगळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र मंदा नागले आणि नामदेव अखाडे यांनी केले.प्रास्ताविक श्रीकांत पवार यांनी केले तर आभार इंजिविजय नाखले यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे कार्यवाह अशोक नागले, कारंजा कृषी ऑफिसचे पर्यवेक्षक यशवंत सहारे ,धम्ममित्र मंदा नागले, जितेंद्र गाडगे, प्रशांत सोमकूवर ,मदन नागले, अनिकेत विघ्ने , प्रकाश देशभ्रतार ,संगीता सहारे ,दुर्गा कांबळे ,राजेश भाऊ दहिवडे ,वंदना नाखले, जयश्री गाडगे , सुदर्शन भाऊ नाखले , जी.टी. बोरकर इत्यादींनी सहकार्य केले .शेवटी आंधळ्या व गरजू व्यक्तीं तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


