वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
संत बाबुराव महाराज पुण्यतिथी महोत्सव.
कारंजा :-
सर्व जाती संप्रदायाच्या संतांनी समाजाला उपदेश करताना मानव धर्म सर्वात श्रेष्ठ आहे असा असा उपदेश करून मानवामध्ये राष्ट्रधर्माचे बिजारोपण करून समाजाला राष्ट्रधर्म शिकवला. असे विचार राष्ट्रीय समाज प्रबोधनकार गजानन महाराज भोरे यांनी आपल्या गोपालकाल्याच्या कीर्तनातून व्यक्त केले.
नारा येथे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचे अनुयायी विदेही संत बाबुराव महाराज यांचे पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 5 ते 12 पर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात भजन प्रवचन दिनांक 11 ला गाडगेबाबांचे अनुयायी धर्मदास बाबा यांची उपस्थितीत भव्य पालखी व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक बाराला भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपाल काल्याच्या कीर्तनाला पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
भोरे महाराज यांनी गोपालकाल्याचे कीर्तनातून संतांच्या विचाराचे अनेक दाखले देऊन उपस्थित भाविकांना प्रबोधन केले. यावेळी सात संगतीला मृदंग वादक अरुण महाराज ठोंबरे, किसनराव महाराज बहुरूपी, हार्मोनियम वादक किसनराव महाराज बहुरूपी, गायक संजय महाराज कडू, विणेकरी शिवदास आप्पा ( चिंचोली गवळी ) आदींची उपस्थिती होती. आरती गोपालकाला व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

