यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- कैलास कोडापे
आज दिनांक 11 जानेवारी 2025 ग्रामीण विकास प्रकल्प राळेगाव येथे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती बारा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील कलावंत न्यायहक्क समितीचे पदाधिकारी मार्गदर्शक म्हणून लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युसुफली सय्यद यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद वतारी यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक कोल्हे यांनी पार पाडले यावेळी सुधीर चौधरी, दिगंबरराव गाडगे . व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गंगाधर रावजी घोटेकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागा तील कलावंतांना त्यांचे न्याय हक्क शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी संघटितपणे प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची गरज असून त्याकरिता कलावंतांची संघटन शक्ती मजबूत करणे यावर चिंतन करण्यात आले भविष्यात ग्रामीण भागातील 5000 कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचा मानस या समयी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



