बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुनील वर्मा
लोणार/याबाबत सविस्तर वृत्त असे की,लोणार तालुक्यातील ग्राम धाड येथील ज्योतीबा रोहिदास जुंबडे यांनी सदर कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन दिले आहे.

१)समाज कल्याण विभाग अंतर्गत दलीत वस्ती विकासासाठी आलेला निधी प्रत्यक्ष त्याच ठिकाणी खर्च न करता इतर ठिकाणी खर्च केल्याचा कामाबद्दल योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी . २)अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे २०२३-२४ अंतर्गत ग्राम पंचायत धाड येथील दलीत वस्तीमध्ये दोन सिमेंट रस्त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी दोन कामे मंजूर होते परंतु सदर दोन्ही रस्त्याच्या नावाखाली एकाच रस्त्याचे काम पूर्ण झाले व तेही निकृष्ट दर्जाचे काम झाले व कागदोपत्री दोन रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे बिले काढून लाखों रुपयेचा भ्रष्टाचार सरपंच व सचिव यांनी संगनमताने केला आहे या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.

३) जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुतारीचे करण्यात आले असे दाखवून बिले काढून भ्रष्टाचार करण्यात आला सदर शाळेत मुतारी असताना मुतारी बांधकामांचे बिले काढण्यात आले याची चौकशी करून कारवाई करावी जिल्हा परिषद शाळेत शौचालयाचे नवीन बांधकाम करण्यात आले असुन या कामात निकृष्ट सिमेंट रेती खडि लोखंड सर्व निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले असुन सरपंच व सचिव यांनी संगनमताने काम निकृष्ट दर्जाचे केले सदर कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी ४) १५व्या वित्त आयोगानुसार मौजे धाड येथील सिमेंट रस्त्याचे काम नदी ओढ्याततील माती मिश्रीत निकृष्ट दर्जाची रेती वापरून व कमी किमतीचे सिमेंट वापरण्यात आले असुन याची आपण तपासणी केल्यास दिसुन येईल वरिल सर्व कामामध्ये शासकीय निधी वापरून भ्रष्टाचार करण्यात आला आहे वरील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी नसता सदर कामाची चौकशी व कारवाई सात दिवसांत न केल्यास ग्रामपंचायत कार्यालय धाड येथे आमरण उपोषणाचा इशारा अर्जदार ज्योतीबा रोहिदास जुंबडे यांनी १)गटविकास अधिकारी पंचायत समिती लोणार, २)उपविभागीय अधिकारी मेहकर, ३)तहसीलदार साहेब लोणार, ४)पोलिस स्टेशन ठाणेदार लोणार, ५)मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, ६)सिध्दार्थ खरात साहेब विधानसभा आमदार मेहकर यांना निवेदन देण्यात आले आहे.



