अकोला विभाग् प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
किराणा दुकानात साहित्य घ्यायला जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन लुटारूंनी हिसकावून पळ काढला. गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केवल कॉलनी येथे ही घटना घडली. येथील रहिवासी एक महिला दुपारी परिसरातील किराणा दुकानात साहित्य घ्यायला जात होती, त्यावेळी परिसरातील एका मंदिराजवळ दोन दुचाकी अचानक तिच्याजवळ आल्या, काहीच काढण्याआधीच दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सहा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. गाडगे नगर पोलिसात महिलेने तक्रार दाखल केली आहे.


