अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
वाशिम येथील हिंगोली रोडवरील बाहेती मार्केट येथून उड्डाण पुलावरून स्कुटीने जाणाऱ्या विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बायस यांना दोन अज्ञातांनी अडवले आणि मारहाण करत त्यांच्याकडील तब्बल १ कोटी आणि १५ लाख रुपयांची बॅग हिसकावून मोटार सायकलने पळाले. या घटनेबाबत विठ्ठल हजारेंनी वाशिम शहर पोलिसांकडे फिर्याद केली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तपास सुरु केला. चोरीनंतर २४ तासातच सीसीटीव्हीच्या सहाय्याने संशयित आरोपी विजय गोटे याला तोंडगाव येथून अटक केली.


