पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
दिं.०९ जानेवारी २०२५गडचिरोली येथे आयोजित कृष्णलीला भव्य भागवत सप्ताहाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते व सौ. अर्चनाताई नेते यांनी उपस्थित राहून कृष्णामृत भागवताचा लाभ घेतला. हा अध्यात्मिक कार्यक्रम ५ जानेवारी २०२५ पासून सुरू झाला असून, १४ जानेवारीपर्यंत संपन्न होणार आहे.या भागवत सप्ताहात कृष्णभक्ती, कृष्ण लीला, आणि कृष्णाच्या बालपणाच्या अद्वितीय रूपांचे सजीव दर्शन घडवण्यात आले आहे. कार्यक्रमाचा आस्वाद घेत भाविकांनी समाधान व्यक्त केले. मा. खा. अशोकजी नेते यांनी यावेळी मार्गदर्शन करत म्हटले, “अशा धार्मिक कार्यक्रमांची आजच्या आधुनिक जगाला खूप गरज आहे. यामुळे समाजाला अध्यात्मिक प्रेरणा मिळते. भाविकांनी या भागवत सप्ताहातून जीवनातील सकारात्मकता व शांती मिळवावी.”गडचिरोलीतील या भव्य भागवत सप्ताहाचा अध्यात्मिक उत्सव नागरिकांच्या मनात भक्तीचा नवा संचार घडवून आणेल असा विश्वास व्यक्त करतो.असे प्रतिपादन या भागवत सप्ताहाला मा.खा.अशोकजी नेते यांनी केले. सप्ताहादरम्यान भाविक सकाळी परिसर स्वच्छ करून रांगोळी काढतात, प्रार्थना करून मन शुद्ध करतात, आणि संपूर्ण कार्यक्रमात अध्यात्मिक तल्लीनतेचा अनुभव घेतात.कार्यक्रमात दिलीपजी सारडा यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


