छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी:- कृष्णा सोलाट
श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या आर्थिक पिळवणूकच्या तक्रारी च्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाकडुन तपासणी समिती गठीत व लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.मागील काही दिवसांपूर्वी मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस राजीव जावळीकर यांनी व मनसे विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी यांनीश्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या आर्थिक पिळवणूक तक्रारी च्या अनुषंगाने चौकशी समिती गठीत करण्याबाबत निवेदन दिले होते.


