सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद येथे राज्यस्तरीय आदिवासी उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन आदिवासी कर्मचारी संघटना पुसद ट्रेड युनियन एनजीपी द्वारा पुसद येथे 29 डिसेंबर रोजी पार पडला . राज्यातून वधू वर परिचय मेळाव्यासाठी मुलं व मुली मोठ्या संख्येने वधु वर परिचय नोंदवला
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शिवाजीराव मोघे माजी मंत्री हे उपस्थित होते, माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले , प्रमुख अतिथी संभाजीराव सरकुंडे माजी शिक्षणाधिकारी माधवराव वैद्य जानकीराम डाखोरे, मा. पोलीस अधीक्षक डॉक्टर संतोष टारफे माजी आमदार डॉक्टर आरती ताई फुफाटे , व राज्यातून आजी-माजी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुसद येथील आदिवासी कर्मचारी संघटनेने अतोनात प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल राज्यातून कौतुक होताना दिसत आहे.



