वर्धा जिल्हा प्रतिनीधी: – युसूफ पठाण
- कारंजाच्या आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचार्याना दिला दम
आर्वी : प्रशासनान काम करताना चुका होतात. त्या आपण समजून घेऊ. परंतु, वैयक्तिक स्वार्थासाठी चुका झाल्या. त्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या तर पाठीशी घातल्या जाणार नाही. कारंजा तालुकातील विकास कामांसाठी 6 महिन्यांचा एक आराखडा तयार करा, अशी सुचना आ. सुमित वानखेडे यांनी दिल्या.
कारंजा (घा.) पंचायत समिती येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख उपस्थित होते.
आ. वानखेडे पुढे म्हणाले की, प्रशासनात काम करताना येणार्या अडचणी आपल्याला फोन वरून थेट सांगू शकता. आपल्या एका पत्राने त्या सुटू शकतील असे प्रयत्न करू. त्यासाठी मंत्री किंवा सचिवांकडे पाठपुरावाही करू. आपले प्रथम अधिकारी म्हणून गटविकास अधिकार्यांनाही तुम्ही तुमच्या अडचणी सांगू शकता. जनतेची कामं करताना बर्याच अडचणी येतात याची आपल्याला कल्पना आहे. जनतेच्या भावाना ओळखून आपल्याला विकास साध्य करायचा आहे. ही कामं करताना अनवधानाने चुका झाल्यास आपण समजू शकतो. परंतु, त्या चुका मुद्दाम झाल्याचे आपल्या निदर्शनात आल्यास आपण माफ करणार नाही. आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना ताकदीने राबवायच्या असल्याच्या सुचना आ. वानखेडे यांनी केल्या. 6 महिन्याचा रोडमॅप तयार करण्याच्या सुचनाही आ. सुमित वानखेडे यांनी यावेळी केली.
यावेळी संबंधीत अधिकार्यांनी पाणी पाणीपुरवठा योजना, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, रोजगार हमी इत्यादी विभागाचे सादरीकरण केले व योजना राबवत असताना येणार्या प्रशासकीय अडचणींवर चर्चा झाली.
आढावा बैठकीला विस्तार अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


