विभाग प्रतिनिधी:- कैलास राजे घरत..
डॉ. बाजीराव कदम माझे चुलते, आपलं घर हे चांगले असावे ही प्रत्येकाची इच्छा असते २०१० त्यांनी घर बांधन्यास सुरूवात केली अनेक अडचणींवर मात करत २०११ मध्ये पुर्ण झाले घर चिखल-मातीमध्ये पक्क्या विटा मध्ये बांधले पण त्याची आतील कामे मुलांच्या शिक्षणामुळे पूर्ण करता आली नाहीत. त्यांची दोन्ही मुले रत्नागिरी नवोदय मध्ये शिक्षण घेत होती. त्यांच्याकडे पालक भेटीला जायचे म्हणजे टु व्हीलर वरून जावे लागत होते त्याची दमछाक व्हायची तिथे शिक्षण घेणारी सर्व मुले ही श्रीमंत घराण्यातील, सगळ्याचे पालक पालक भेटीला येतेवेळी फोर व्हीलर गाडीने येत असतं त्यांना पण वाटायचे की आपली पण फोर व्हीलर गाडी असायला पाहिजे, त्यांना सारखं वाटायचं आपली पण मुलं घरी सुट्टीला जाताना फोर व्हीलर मधून जायला पाहिजेत म्हणून त्यांनी २०१७ ला धाडस करून महिंद्रा फायनान्स मध्ये लोन करून नवीन अल्टो गाडी काढली. संसाराचा गाडा चालवत चालवत त्यांनी २०२३ ला गाडी निल केली. गाडी घेतली पण त्यांनी घराकडे लक्ष दिले नाही. आमची चुलती चुलत्याना सारखी म्हणायची की आपलं घर कधी चांगलं करणार, कारण दुसऱ्याची घरं छान दिसतायत आपण पण आपले घर कधी सुंदर बांधणार … चुलते नेहमी चुलतीला समजवून सांगत होते की आपल्या मुलांच शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण आपल्या घराकडे लक्ष देऊया….आणि ती वेळ आणि योगायोग त्यांना जून २०२४ ला आला. कारण त्यांची दोन्ही मुले मोठा वैभव हा केमिकल इंजिनिअर झाला आहे तो आय टी मध्ये पुण्याला सर्व्हिस करतोय व छोटा बी टेक अग्री झाला असुन तो आता शक्तीमान अग्रो मध्ये सर्व्हिस करतोय. २०११ ते २०२४ जवळ जवळ १३ वर्षं त्यांनी त्या घरात गुन्यागोविदाने दिवस घालवले आहेत..आणि आता ते त्यांचे स्वप्न साकार झाले आहे, गेले ६ महीने अहोरात्र कष्ट करून त्यांना पाहिजे तसं घर जुन्या घरालाच स्वप्नातील घर बनविण्याचा प्रयत्न केला आहे…

आणि तो त्यांचा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला आहे, त्या दोघांचे कौतुक करावे तितके कमीच आहे त्यांचा तो आनंद आपल्या सर्वांच्या येण्याने द्विगुणित झाला आहे. स्वागतोच्छुक:- तात्या,काकी, वैभव,सौरव…या निमित्ताने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार विजेते, महाराष्ट्र भूषण, भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली, महासचिव मुंबई ठाणे विभाग पत्रकार श्री.विजय वसंत कांबळे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.


