अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
एका अल्पवयीन मुलीवर गुरुवारी सायंकाळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. दरम्यान अकोल्यातल्या पातूर पोलिस ठाणे अंतर्गत एका गावातील नऊ वर्षीय मुलगी घराजवळ शेळीच्या पिल्लांसोबत खेळत असताना हा प्रकार घडलाय. शेळीचे पिल्लू धावत एका घरामध्ये शिरले, शेळीच्या पिल्लाला परत घेण्यासाठी चिमुकली त्या घरामध्ये गेली असता, घरात ५५ वर्षीय गवई नामक व्यक्तीने इतर कोणीही घरात नसल्याचा फायदा घेऊन नराधमाने या नऊ वर्षीय चिमुकलीला पकडून तिच्यावर अत्याचार केलाय.
पुढील तपास पोलीस करत आहेत..


