छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी कृष्णा सोलाट
डॉ मनमोहन सिंह यांना या गोष्टींचा कधी अभिमान वाटला नाही, त्यांनी हे आपलं कर्तव्य समजून काम केलं. त्यांनी कधी आपल्या गरीबीचे, फाळणीमुळे झालेल्या त्रासाचे रडगाणे देशासमोर गायले नाही. ना कधी आईच्या मृत्यूची कहाणी सुनावली.
कुणाही आजी, माजी नेत्यांवर टपोरी भाषेत टिका केली नाही. आपल्या जाती-धर्माचे प्रदर्शन करून मुर्खासारखे भावनीक आव्हान केले नाही. ना कहाण्या रचल्या. ना आपल्या शिक्षणाचा अभिमान मिरवला.
नेत्यांचा DNA विचारणे, महिला नेत्यांविषयी असभ्य भाषेत बोलणे, देशात जन्म झाल्याची लाज वाटते असे म्हणून देशाची अब्रू परदेशात घालवणे… हे न करता केवळ देशाच्या आर्थिक बाबी, आपले काम, भविष्यात करायचे काम यावर संसदेत हजारो अभ्यासपुर्ण भाषणं केली, विरोधकांनी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सभ्य भाषेत उत्तरे दिली.


