सिद्धार्थ कदम
पुसद तालूका प्रतिनिधी
पुसद : पुसद नगर परिषद क्षेत्रातील अंतर्गत गेल्या 30 ते 40 वर्षापासून वास्तव करणारे नागरिकांना त्यांचे राहत असलेल्या जागेवरच (सरकारी) त्यांच्या जागेची मोजणी करण्यात आली असून अद्यापपावतो त्यांना नमूना ड लिजपट्टे देण्यात आलेले नाहीत
या संदर्भात वाशिम – यवतमाळ चे लोकप्रिय खासदार श्री संजय देशमुख ह्यांना त्यांचे दिग्रस येथील निवासस्थानी दिनांक 23 / 12 /24 महाविकास आघाडीचे वतीने शिवसेना ( उबाठा ) पक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी वतीने शिष्टमंडळ भेटून त्यांना पुसद शहरातील न.प. क्षेत्राचे अंतर्गत सरकारी जागेवर राहत असलेल्या नागरिकांनी 30 ते 40 वर्षापासून वास्तव करीत असून त्यांना पंतप्रधान आवास योजने पासून वंचित ठेवले जात असून त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही तसेच नियमानुसार घरकूल बांधकाम करण्याकरिता शासन निर्णयानुसार रेती उपलब्ध करून द्यावी या संदर्भात खासदार श्री संजय देशमुख यांनी त्वरित पुसद नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री वायकोस ह्यांना ह्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली तेव्हा मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांनी खासदार महोदयांना सदर घरकूल व लिज पट्टे बाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

या शिष्टमंडळामध्ये शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने विजय बाबर पुसद विधानसभा संघटक , वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष जयानंद उबाळे, महासचिव अरुण राऊत हे उपस्थित होते.


