नांदेड विभाग: शुभम उत्तरवार (लोहा)
दक्षिण भारतातील व नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी माळेगाव यात्रेची आढावा बैठक नांदेडचे जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण व लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ.शिवाजीराव काळगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल व अतिरिक्त पोलीस अधिकारी सुरज गुरव साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
खा.रवींद्र चव्हाण यांनी कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो सन्मान देऊन त्यांचा सत्कार करावा.बारामती च्या धर्तीवर कृषी प्रदर्शनासाठीचालना द्यावी जिल्ह्यातील विविध लोककलेला प्रोत्साहन पर बक्षीस वितरित करावे आशा महत्वाच्या सूचना मांडल्या आरोग्याच्या सुविधा संदर्भामध्ये कुठलीच गैरसोय होणार नाही याची सक्त ताकीद यावेळी आरोग्य विभागाला दिल्या पोलीस प्रशासनाने महिलांच्या दागिन्याच्या चोरी संदर्भात जास्तीत जास्त लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या यावेळी नवीन डिजिटल यंत्रणेचा वापर करून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा स्व.विलासराव विलासरावजी देशमुख यांचे योगदान महत्वाचे आहे

.त्यांच्या स्मारकाबद्दल लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी सूचना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिल्या.यात्रेला राजकीय रूप न देता यात्रा भाविक भक्तांची आहे आणि ती सुरळीत पार पाडावी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मान्यवरांचा जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने व मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या आढावा बैठकीला माजी. आमदार रोहिदास चव्हाण साहेब, माजी सनदी अधिकारी एकनाथराव मोरे साहेब, जिल्हा परिषद माजी सभापती संजय आप्पा बेळगे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील सुरनर, माझी जिल्हा परिषद सदस्य संजय भोसीकर, माझी जि. प. सदस्य डॉ.विजय धोंडगे, काँग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, व लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, मा. जि. प. सदस्य श्रीनिवास मोरे, माझी शिक्षण सभापती नांदेड संजय पाटील कराळे ,संदीप पाटील उमरेकर, माझी जि प सदस्य आनंदरावजी गुंडले, मा. जि.प.सदस्य रंगनाथराव भुजबळ गुरुजी वसंतराव पवार, नितीन फाजगे ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आडेराघो साहेब, माळेगांवचे सरपंच हणमंत धुळगुंडे व ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ जिल्हा परिषद च्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

