जय जगन्नाथ क्रीडा मंडळ गारगोटी (पोड) दहेगांव येथे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-रजत चांदेकर
जय जगन्नाथ क्रीडा मंडळ दहेगाव गारगोटी द्वारा आयोजित एक दिवशी कबड्डीचे प्रेक्षणीय दणदणीत सामन्यांचे उदघाटन बुधवार दिनांक25/12/2024 ला सायंकाळी चार वाजता करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुखदेव बोरखेडे साहेब यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वैभव व्यापारी, सुदामराव बलकी माजी सरपंच अमोल गमे सामाजिक कार्यकर्ता, हे होते तर कार्यक्रमाला उपस्तित ,किशोर दातारकर, दशरथ खैरे, सूर्यभान मडावी, संजयभाऊ कुबडे, विठ्ठल झाडे, कवडुजी मांडवकर रणजित टेकाम सदाशिवराव मडावी नंदुभाऊ टेकाम कैलास आत्राम कपिल आत्राम विठ्ठल कांडेकर आणी जय जगन्नाथ क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू आणी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


