अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
माहेरहून ५० हजार रुपये घेऊन येण्याचा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी उरळ पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध आज गुन्हा दाखल केला. बाळापूर तालुक्यातील निंबा माहेर असलेल्या तेजस्वीनी प्रवीण खंडेराव हिचा पती प्रवीण भिकाजी खंडेराव, जेठ प्रकाश खंडेराव, जेठाणी अनिता प्रकाश खंडेराव, देर राजू भिकाजी खंडेराव, सासू कुसुम भिकाजी खंडेराव सर्व रा. पैसोडा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा, नणंद वैशाली अनिल अवचार, नंदई अनिल अवचार, रा. भोनगाव, ता. शेगाव यांनी शारीरिक व मानसिक छळ केला.


