अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
बार्शीटाकळी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील २१ वर्षीय महिलेला शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याप्रकरणी आज बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेचे पती १२ डिसेंबर रोजी बाहेरगावी गेले असता २५ वर्षीय आरोपीने घरात घुसून महिलेला शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केला. या तक्रारीवरून आज बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बार्शीटाकळी पोलिस करीत आहे.


