अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
शहरात बेशिस्त वाहतुकीने कळस गाठला आहे. बसस्थानकासमोर वाटेल तशी वाहने उभी करीत असल्याने पोलिसांनी दिवसभर बेशिस्त वाहनांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविली. वाहतूक शाखा पोलिसांच्या कारवाईला न जुमानता काही ऑटोचालक त्यांची वाहने वाटेल तिथे उभी करीत असल्याचे चित्र शहरात रोजच दिसून येते. मुख्य टपाल कार्यालय ते टॉवर चौकापर्यंत प्रचंड वर्दळ असतानाही या ठिकाणी ऑटोचालक रस्त्यावर कुठेही ऑटो उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला आहे.


