वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी च्या विद्यार्थांनी नुकताच झालेल्या स्पर्धेत विभागीय गट स्तरीय कामगार बालनाट्य स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रथम आणि दृतिय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा मंगळवारी दि. १७ डिसेंबर रोजी चंद्रपूर येथे पार पडली.
नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी च्या नंदिनी गुढेकर आणि ईश्र्वरी झाडे यांना सर्वोत्कृष्ट आणि उत्कृष्ठ अभिनय मुली चा पुरस्कार प्राप्त झाला आणि अभिनय मूले मध्ये सात्विक शिंदे आणि प्रतेष वाघमारे यांना सर्वोत्कृष्ट आणि उत्कृष्ठ अभिनय मुल यासाठी चा पुरस्कार प्राप्त झाला.
या स्पर्धेत एकूण दहा संघाने भाग घेतलेला असून त्यात 12 बक्षिशांच्या कॅटेगरी पैकी एकूण नऊ बक्षीस वर्ध्यातील संघाने मिळवले.
या स्पर्धेत सोमलवार शाळेच्या देखील सहभाग होता तेथील विद्यार्थ्यांनी द्वितीय बक्षीस प्राप्त केले, त्याकरिता संस्थेच्या प्राचार्य मुख्याध्यापक प्रिती देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “हा विजय सोमलवार शाळेच्या शिक्षणाच्या गुणवत्तेच प्रतिबिंब आहे आणि सोबतच नाट्यप्रतीक थिएटर अकॅडमीच्या मेहनतीचे फळ आहे”.
या स्पर्धेकरिता लाभलेले परीक्षक माननीय श्री जगदीश नंदुरकर सर माननीय श्री सागर मुने सर आणि माननीय सौ. Adv. चैताली कातलावार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्व मुलांना लाभले त्याकरिता नाट्यप्रतीक अकॅडमीने त्यांचे आभार मानले.

या यशात वाटेकरी असणारे विद्यार्थि सौम्या भोंडवे, ईश्वरी झाडे, अस्मि देशपांडे, परी श्रीवास, श्रुती देशमुख, संजीवनी गायकवाड, वंशिका बोबडे, अन्वी देशपांडे, अनुराग काळे, रिदम झाडे, नंदिनी गुडेकर, सात्विक शिंदे, अर्थव मानमोडे, चारवी शंभरकर, पूर्वी शेंडेऊर्वी अगम, आर्या गायकवाड, तन्वी मोरे, जानवी देशमुख, लावण्या पांढरे, कृतिका तांदूळकर, आरंभी साटोने, अधिराज देशमुख, आरुष साळवे, शाश्वत कोपरकर, प्रयाग वाघ, मयंक पोल, सार्थक इमाने, वंश ठावरे, महेश नेहारे, चैतन्य आमले, कृष्णा8 कोहळे, कार्तिक भोले, चैतन्य अखुज, अथर्व अतकर, नैतिक गुल्हाने, सोहम देवगिरकर, आराध्य राऊत, विहान इंगोले, प्रतेश वाघमारे, श्रेयश खडतकर, सर्वेश कुईते, युगांत उईके, ईशान गुल्हाने, या सर्व विद्यार्थ्यांचे नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी चे संचालक प्रतिक सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धसाठी विशेष मार्गदर्शक प्रतिक सूर्यवंशी आणि प्रिती देशमुख मॅडम.
स्पर्धा यशस्वी करण्यास अदिती देशमुख, पूनम बोबडे, तुषार बोबडे, अभिजीत यांनी परिश्रम घेतले.


