परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद निर्मळ
मससाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पदधतीने हत्या झाली, हे प्रकरण होऊन आज तेरा दिवस होऊन गेली तरीही अद्याप पोलिसाना आरोपी सापडत नाहीत या आरोपीना पकडू नये म्हणून मोठे राजकीय पुढारी पोलीसा वरती दबाव आणत आहेत, जे कोणी पुढारी दबाव आणत आहेत त्याचे नाव पोलीसानी जाहीर करावे नसता आम्हि आणलेल्या बांगड्या घालून फिरावे ,अशा आशयाचा ठराव आज परभणीत झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

कोणाच्याही सुखदुखात कशाचीही पर्वा न करता धावत जाणारा सरपंच म्हणून परीसरात ओळख होती . त्या सरपंचाला नराधमांनी अत्यंत वाईट हाल करून मारले या घटनेनंतर सर्व मराठा समाजात चिड निर्माण झाली आहे.

या बैठकीत मराठा समाजातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.परभणी जिल्ह्य़ातील सकल मराठा समाजातील सर्व महिला उपस्थित होत्या परभणीत माहेर मंगल कार्यालयात आज सकाळी 11 वा.बैठक झाली या बैठकीत एकमताने ठराव मंजुर करण्यात आला. या प्रसंगी विद्या पाटील, अध्यक्षा,अमृता कदम उपाध्यक्ष, अर्चना निकम आशाताई गायकवाड, किरणताई सावंत आदी महिला उपस्थित होत्या.

