प्रतिनिधी:- कु.ओवी कैलास घरत आणि ग्रूप ने काश्मिरी गर्ल्स “बुमरो ग्रूप डान्स” बेस्ट डान्स परफॉर्मन्स केला. तसेच “कृष्ण जन्मला ग बाई” या सामूहिक नृत्यात ” भूमिका साकारली. यावर्षी पनवेल फॅशन फिस्टा 2024 मध्ये खारपाड्याची सुकन्या कु.ओवी कैलास घरत बेस्ट कॉस्च्युम अवॉर्ड ने सन्मानित झाली होती. कु.ओवी घरत ही सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय पुरस्कार विजेते पत्रकार श्री.कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी सुकन्या असून ती के.ई.एस् लिट्ल अंजेल्स इंग्लिश मिडीयम स्कूल पेण येथे इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकत आहे. लहानपनापासूनच ओवीला अभिनयाची आवड असून अनेक नृत्य स्पर्धांमध्ये सहभागी होऊन लावणी प्रकारात “सांगा ना कधी दिसते मी या नववारी साडीत”… मुझको आज कल है..”डिंग डाँग डिंग..या माधुरी दिक्षित यांच्या गाण्यावर प्रथम क्रमांक मिळविले आहेत. तसेच झुलवा पाळणा.. बाळ शिवाजीचा..अशा अनेक गाण्यावर ती नृत्य करते.

यासोबत ओविला मॉडेलिंग,आर्ट अँड स्केच, ड्रॉइंग, सिंगिंग, भाषण, क्राफ्टींग नवीन कलाकृती बनविणे, ट्रेकिंगची आवड आहे. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर कण्याचा ओवीचा मानस असून जुगाड्या फेम कलाकार मॉडेल ॲक्टर देव घरत तसेच महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी नेहा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ओवी अभिनयाचे धडे घेत आहे. ओवीला मिळालेल्या यशाबद्दल तिचे नातेवाईक मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे. वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळत असतो. आपली कला सादर करण्यासाठी त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळते. त्यामुळे विद्यार्थी या दिवसाची वाट पाहत असतात. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सामूहिक गाण्यांवर नृत्य सादर केले.



